भुगाव : भुगाव येथे हीरा गार्डन समोर द वन, स्प्लेंडर ग्रिन,सिताई लेक सोसायटींकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला आहे यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना सुरक्षित घरी जाता यावे यासाठी तातडीने रस्ता करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
सोसायटीकडे जाणारा रस्ता कच्चा असून यामुळे पावसाळ्यात रस्ता वाहून गेल्यानंतर नागरिकांना रस्त्यावरच गाड्या लावून सोसायटीत जावे लागते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तसेच खड्डे असल्याने नागरिकांना पायी देखील चालता येत नाही.
याबाबत नागरिकांनी पीएमआरडीए ला वारंवार रस्त्याचे दुरुस्ती करून देण्यात यावी तसेच या परिसरात रस्ता करण्यात यावा अशी मागणी केली आहे. पी एम आर डी ने या परिसरात बांधकाम परवानगी देताना रस्ता असल्याची बाब तपासली नसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे या परिसरातील नागरिक सांगतात. या परिसरात सुमारे 300 हून अधिक फ्लॅट धारक आहेत. नागरिकांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी अंतर्गत असते तातडीने तयार करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.