औंध बाणेर बालेवाडी पाषाण आदी गावांमध्ये राजकीय गावबंदी व पुणे विद्यापीठ चौकात 31 ऑक्टोबर रोजी आंदोलन

पुणे : सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा औंध,बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी , सुस , महाळुंगे , बोपोडी ,छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील मराठा समाजाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे मंगळवार दिनांक 31/10/2023 पासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जालना अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा उपोषण सुरू आहे. या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनासाठी मराठा समाज महिलांसह रस्त्यावर उतरेल व ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. तसेच प्रत्येक गावातील मराठा समाजाचा नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्ष ठेवून सहभागी होईल असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच या गावांमध्ये मराठा समाजाच्या वतीने सर्वच राजकीय नेत्यांना गाव बंदी जाहीर करण्यात आली असून मराठा समाजाच्या भावनांचा व मागण्याचा विचार करून सर्वच राजकीय नेत्यांनी राजकीय कार्यक्रम टाळावेत तसेच राजकीय नेत्यांना बोलवून कार्यक्रम घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  कोथरूड मध्ये पेट्रोल २४ रुपयांनी स्वस्त, वर्धापन दिनानिमित्त कोथरूड युवक राष्ट्रवादी तर्फे यशस्वी मोहीम