पुणे – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा ‘आनंदोत्सव’ हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात पार पडला. यावेळी
उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या माॅर्डन महाविद्यालये व विद्यालयांचा सत्कार करण्यात आला. डाॅ विनय कुमार व डाॅ शिल्पा मुजुमदार यांना उत्कृष्ठ संशोधनासाठी गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग, भारत सरकार) उपस्थित होते. या प्रसंगी ते म्हणाले,” सातत्याने गुणवत्ता राखणे हा अपवाद आहे.ही संस्था अतिशय दैदीप्यमान यश संपादन केलेली आहे. शिक्षणाचा व्यापार व व्यवसाय होता कामा नये. ईथिक्स, ईकाॅनाॅमिक्स आणि ईंनव्हायरमेंट हे संभाळून विकास करणे गरजेचे आहे. ज्ञान ही खुप मोठी शक्ती आहे. संशोधनामधे गरज ओळखुन काम करणे गरजेचे आहे. हि संस्था हे सगळे गुणवत्ता मापन पार करुन विकास करत आहे. सस्थेचे अभिनंदन.
चंद्रकांतदादा पाटील (मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य) म्हणाले, प्रत्येक विद्यार्थिनीला पाॅकेट मनी रु २००० मिळावा या माॅडेलवर सरकार विचार करत आहे. यावर लवकरच तोडगा काढु.
यावेळी खासदार मेधाताई कुलकर्णी (राज्यसभा), आ. सिद्धार्थ शिरोळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरु डाॅ पराग कालकर, प्रा. शामकांत देशमुख (कार्यवाह), प्रा. डॉ. ज्योत्स्नाएकबोटे (सहकार्यवाह), तसेच प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे (नियामक मंडळ सदस्या व उपकार्यवाह) यांचीही उपस्थित होते.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे सर्व उपस्थित मान्यवरांनी मन:पूर्वक कौतुक केले. ईशस्तवन प्रियंका भट यांनी तर पसायदान स्वाती पटवर्धन यांनी सादर केले.कार्यक्रमाचें प्रास्ताविक प्रा डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले,आभार शामकांत देशमुख यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा डॉ. निवेदिता एकबोटे यांनी केले.