डोणजे (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी रोहिणी शंकर कुंभार

खडकवासला : डोणजे (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी रोहिणी शंकर कुंभार यांची निवड करण्यात आली. शितल योगेश भामे यांनी सरपंच पदाच्या दिलेल्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार आज निवडणूक घेण्यात आली. अध्याशी अधिकारी म्हणून मंडल अधिकारी हिंदुराव पोळ आणि सचिव म्हणून ग्रामसेवक सतीश चव्हाण यांनी निवडणूकीचे  काम पाहिले.

निवडीनंतर  माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती पूजा पारगे कुंभार यांचे अभिनंदन केले. यावेळी  उपसरपंच मारुती कंक,  ग्रामपंचायत सदस्य तेजस कोडीतकर, सारिका भगत, योगेश भामे,  सायली चव्हाण, स्नेहल वाल्हेकर, यांच्यासह संभाजी वाल्हेकर, सारिका चव्हाण, किरण माने, अल्का लच्छांड,  दीक्षा पारगे,  वनिता कुंभार, प्रियांका कंक, भारती भांगरे, आरती कोडीतकर, वैशाली तांबे, पूनम भिलारे, पूजा भिलारे,  वैशाली चिकणे, संध्या कंक, चैत्राली भांगरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  श्रेय वादाच्या २४×७ पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनानंतर तरी पाणी मिळणार का?- वंचित बहुजन आघाडी