बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे  वृक्षारोपण

बालेवाडी : बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या वतीने बालेवाडी परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. रस्त्याच्या कडेला, सोसायटीत, अमेनिटी स्पेस व मोकळ्या जागेत दरवर्षी झाडे लावण्यात येणार आहेत. आतापर्यंत ११०० पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. सोसायटीचे पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक झाडांची काळजी घेतात. त्यामुळे सत्तर टक्के झाडे जगली आहेत.

पलक मार्ग, बालेवाडी येथील सोसायटींच्या मैदानावर ३१ झाडे यावेळी लावण्यात आली. वृक्षारोपण यशस्वी होण्यासाठी मोरेश्वर बालवडकर, आशिष कोटमकर, योगेश डुंबरे, सुनिला सप्रे, समाधान गायकवाड,  अस्मिता करंदीकर, शुभांगी चपाटे, ॲड. माशाळकर, दफेदार सिंह, अशोक नवाल, वैभव आढाव, योगेंद्र सिंह  या फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील नागरिकांनी विशेष श्रम घेतले.

See also  बालेवाडी येथे पाण्यात डांबर टाकून पालिका डांबरीकरण ऐवजी डांबरटपणा करत आहे का?