औंध : औंध येथील प्रतिष्ठित औंध व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री. नाना गोपीनाथ वाळ्के यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनांक 27 जुले 2025 रोजी आयोजित विशेष बैठकीत सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला..श्री. नाना वाळके हे गेल्या अनेक वर्षापासून व्यापारी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि व्यापाऱ्याचे हक्क व हित जोपासण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कामकाजात नव्या उत्साहाची आणि दिशा-दर्शक बदलाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या नियुक्तीनंतर श्री. नाना वाळ्के यांनी सांगितले की, “औध मधील सर्व व्यापायांचे प्रश्न, त्यांचे हक्क व सुरक्षितता यासाठी संघटना एकत्र येईल. संवाद आणि सामंजस्याच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाशी समन्वय साधत सकारात्मक बदल घड़वू. औध व्यापारी असोसिएशन मार्फत लवकरच व्यापाऱ्यासाठी
विविध उपक्रम, कार्यशाळा व समस्या निवारण बैठकांचे
आयोजन करण्यात येणार आहे.
सचिन दिनकर निवंगुणे, सदस्य : राष्ट्रीय व्यापारी कौर कमीटी, संदीप राठोड, संतोष भाटेवरा, आशिष राठोड, मनीष सोनिगरा, सुरेश चौधरी, नितीन खोंड तसेच मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.