धायरी येथे साधेपणाने लग्न सोहळे  करणाऱ्यावधुवर माता पित्यांचा सत्कार

पुणे: साध्यापणाने  मुलां मुलींचे लग्न सोहळे करणाऱ्या धायरी येथील वधुवर माता पित्यांचा  सत्कार धायरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धायरी ग्रामस्थांनी बैठक घेऊन बिगर हुंडा साधेपणाने लग्न सोहळे करण्याचे आवाहन केले होते.त्याला प्रतिसाद देत धायरी येथील
संजय विठ्ठल पोकळे व जयश्री संजय पोकळे, विजय विठ्ठल पोकळे व संगीता विजय पोकळे,मारुती श्रीरंग साष्टे व शोभा मारुती साष्टे तसेच राजेंद्र पांडुरंग रायकर हेमा राजेंद्र रायकर  व‌ दिपक तानाजी पोकळे या वधुवर माता पित्यांनी आपल्या मुलां मुलींची लग्ने साध्यापणाने केली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

पोकळे ,साष्टे, रायकर यांनी आपल्या मुलां मुलींच्या लग्नात हुंडा दिला नाही घेतला नाही.वरात,थाट माट न करता कमी वऱ्हाडी मंडळीत वेळेवर लावली. तसेच लग्न समारंभ पुढारी -पाहुण्यांचा  सत्कार केला नाही. संयोजन बाबुराव पोकळे यांनी यांनी केले ‌ . यावेळी पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर,
निलेश दमिष्टे, सनी रायकर, किशोर पोकळे, बाबुराव पोकळे, गणेश पोकळे, चिंतामणी पोकळे, संतोष चौधरी, संदिप पोकळे आदी उपस्थित होते.

See also  कोथरूड मतदार संघातील सुस रोडचा कचरा प्रकल्प हलवणे जे चंद्रकांत दादांना जमले नाही ते अजित दादा करतील का?