बाणेर मध्ये पाणी पालिकेच्या टाकीतून बाहेर पडतं पण सोसायटीच्या टाकीत सोडलं जातं नाही

बाणेर : बाणेर मध्ये पाणी पालिकेच्या टाकीतून बाहेर पडून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पण सोसायटीच्या टाकीत सोडलं जातं नाही यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

लाखो रुपये खर्च करून खऱ्या अर्थाने बाणेर बालेवाडी सुस माळुंगे या भागातील लोकांना पाण्याचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी मोहन नगर बाणेर या ठिकाणी पाण्याचे टाकी बांधण्यात आली आहे. परंतु या पाण्याच्या टाकीवर प्रशासनाचे कसल्याही पद्धतीचे लक्ष नसल्याची दुर्दैवी बाब या ठिकाणी लक्षात येते आज ही टाकी भरून मागील अर्धा तास झालं वाहतीये प्रशासनाला याबाबत विचारणा केली असतास त्यांना कसलेही प्रकारची माहिती नाही. सुस बाणेर परिसरात लोक पाण्यासाठी वन वन फिरत आहेत.

याकडे प्रशासनाने गांभीर्याने बघणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पंधरा दिवसांपूर्वीच बाणेर बालेवाडी करांनी पाण्यासाठी आंदोलन केलं. ज्यांच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी त्या ठिकाणी वाया गेले. त्या संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्या वर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी रयत स्वाभिमानी संघटनेचे ऋषिकेश कानवटे यांनी केली.

See also  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा पेरणे फाटा येथे बसने प्रवास