पुणे : माध्यमिक शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे, प्रभारी शिक्षण अधिकारी कमलकांत म्हेत्रे व विस्तार अधिकारी दाणे यांच्या अनियमित कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच पुणे विभागाअंतर्गत चाललेल्या शैक्षणिक समस्या बाबत कारवाई करण्यात यावी आधी मागण्यासाठी पुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाकडून शालार्थ आयडी वेळेवर दिले जात नाहीत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेळेवर समायोजन केले जात नाही, अनेक शाळा बेकायदेशीरपणे फी वसूल करत आहे तसेच मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्या संगनमताने कर्मचाऱ्यांचा आर्थिक व मानसिक छळ केला जात आहे.
वर्षभर विविध शाळांच्या समस्या पुणे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने मांडून देखील कारवाई होत नसल्याने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक ह.बी. चव्हाण यांनी सांगितले.
उपोषणादरम्यान माजी नगरसेवक तानाजी निम्हण , सतीश पाषाणकर, पाषाण ग्रामस्थ उपस्थित होते. उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात तसेच योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
घर साहित्य/शैक्षणिक शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर पुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने अमरण उपोषण