राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सागर पाटोळे तर उपाध्यक्षपदी अश्विनी पाचारणे

खेड : राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सागर काळुराम पाटोळे यांची तसेच उपाध्यक्षपदी अश्विनी राजेंद्र पाचारणे यांची बिनविरोध निवड झाली. बँकेचे मावळते अध्यक्ष दिनेश ओसवाल आणि उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी पदाचा राजीनामा दिला.

रिक्त पदांसाठी मंगळवारी (दि १) निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी संचालकांची विशेष सभा बोलावली होती. अध्यक्पदासाठी सागर पाटोळे यांच्यासह ज्येष्ठ संचालिका विजया शिंदे यांचे अर्ज दाखल झाले. उपाध्यक्ष पदासाठी अश्विनी पाचारणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. निर्धारित वेळेत विजया शिंदे यांची माघार झाल्याने सरसमकर यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.

अध्यक्ष सागर पाटोळे व उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे यांच्या बिनविरोध निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून आणि भंडारा उधळुन जल्लोष केला. नवनिर्वाचित अध्यक्ष तसेच वडगाव पाटोळे, ता. खेड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सागर पाटोळे दहा वर्षांपूर्वी संचालक म्हणून निवडून आले.मागच्या पंचवार्षिक काळात त्यांनी उपाध्यक्षपदी कामकाज केले.उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे सन २०२२ मध्ये पहिल्यांदा संचालक झाल्या.

दोघांनाही पदाची संधी मिळाली असल्याने समर्थकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. माजी अध्यक्ष किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, दत्ता भेगडे, दिनेश ओसवाल, अविनाश कहाणे, गणेश थिगळे, राहुल तांबे पाटील, विनायक घुमटकर, राजेंद्र वाळुंज, समीर आहेर, अरूण थिगळे , विजय डोळस,सचिन मांजरे, रामदास धनवटे, महेश शेवकरी तसेच उद्योजक राजेंद्र पाचारणे, ॲड गणेश सांडभोर, रामदास पाचारणे, भांबुरवाडीचे सरपंच संतोष ढोरे, सर्जेराव पिंगळे, दोंदेचे माजी सरपंच चंद्रकांत बारणे, अजय ऊढाने, गणेश पाटोळे आदी सभागृहात उपस्थित होते.

सागर पाटोळे म्हणाले, मागील अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे आणि संचालक मंडळाच्या माध्यमातून चांगले काम झाले आहे. प्रगतीपथावर असणाऱ्या बँकेची घोडदौड अशीच सुरू राहण्यासाठी प्रयत्न करताना सर्वांना बरोबर घेऊन कामकाज करणार आहे.

See also  मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने बाल पुस्तक जत्रेत मुलांसाठी 12 हजार मिलेट फूड पॅकेटचे मोफत वाटप