पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज च्या शपथविधी व पदग्रहण समारंभाचे आयोजन सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ रोजी संगम हॉल, पद्मावती येथे करण्यात आले.
या समारंभात क्लबचे नवीन अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि संचालक मंडळाच्या नियुक्ती बरोबरच नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. हा समारंभ मान्यवरांच्या मार्गदर्शनाने व विविध कारणांनी भव्य व संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रगीत तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाला.
या पदग्रहण समारंभाचे अध्यक्ष PDG MJF लायन अभय शास्त्री यांनी नवीन नेतृत्व टीमचे अधिकृत पदग्रहण केले. लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजच्या नव-नियुक्त अध्यक्षा ला.हेमलता जैन, सचिव ला.विलास आवटे, खजिनदार ला.अश्विनी वरुडे पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. संचालक मंडळ व इतर महत्त्वाच्या सदस्यांचीही यावेळी नियुक्ती करण्यात आली.
नवीन सदस्यांचा समावेश आणि शपथविधी VDG 1 MJF ला.राजेश अगरवाल सर यांनी केला, याप्रसंगी क्लबचे सदस्य संस्थापक अध्यक्ष ला.विठ्ठलराव वरुडे पाटील, माजी अध्यक्ष ला.भानुदास पायगुडे, माजी अध्यक्ष ला.डॉ.सतीश कदम, फस्ट व्ही पी ला.रमेश पलंगे आदी मान्यवर उपस्थित होते,
तसेच ला.प्रकाश दीक्षित, ला.सत्यनारायण सारडा, ला.मंगेश सावंत, ला.अश्विनी मोरे, ला.शोभा सोलंकी, ला.शीतल मोहिते, ला.विशाल वरुडे पाटील, ला.संगीता वरुडे पाटील, ला.वंदना आवटे, ला.शिवानी पायगुडे, ला.रमीला राठोड, ला.चंदा सोलंकी, आणि ला.सुनील मोहिते हे सर्व सदस्य उपस्थित होते.
या समारंभात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती, ज्यात माजी नगरसेविका रुपालीताई धाडवे, सामाजिक कार्यकर्ते स्वराज (भैय्या) बाबर, ला.मुथा सर, ला.शैलजा मुथा, क्लबचे मार्गदर्शक ला.रवींद्र गोलार, RC ला.निलेश तरवडे, ला.उमेश अगरवाल, ला.आर. के. शहा, ला.रवींद्रजी पांडे, ला.खैरे,चतुरशृंगी क्लबच्या अध्यक्षा ला.शैलजा चांडक, ला.नितीन थोपटे, ला.महेश खडके आणि ला.विठ्ठल कुटे यांचा समावेश होता.
हा समारंभ क्लबच्या सेवा आणि समाजाशी असलेल्या बांधिलकीचे प्रतीक होता, ज्यामुळे नवीन नेतृत्वाखाली प्रभावी प्रकल्प आणि उपक्रमांच्या वर्षाची सुरूवात झाली. लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज त्यांच्या परंपरेला जपत समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याचे कार्य पुढे सुरू राहील अशी ग्वाही नवनियुक्त पदाधिकारी यांनी दिली.
समारंभाचे अध्यक्ष PDG MJF लायन अभय शात्री यांनी उपस्थितांना मार्गदर्शन तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना शपथ दिली त्याबरोबरच क्लबच्या आत्तापर्यंत केलेल्या कामाचे कौतुक करतानाच हीच परंपरा कायम ठेवत उत्तमोत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संधी दिली त्याबद्दल आभार मानत उत्तम कार्य करण्याची ग्वाही दिली.