सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी तसेच अपघाती विमा सारखी भरपाई मिळावी यावर मंत्रालयात बैठकीत चर्चा

मुंबई : सर्पमित्र हे ग्रामीण व शहरी भागात सापांपासून नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम करतात. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी, तसेच त्यांच्याबाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना अथवा कुटुंबियांना अपघाती विमासारखी आर्थिक भरपाई मिळावी यासाठी वन विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली जाईल, त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले.

यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य वन्यजीव संरक्षक एम श्रीनिवास राव यांच्यासह अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणीमित्र संघटनेचे अध्यक्ष प्रा.  डॉ. संभाजी पाटील आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

See also  गरीबाचा मुलगा आय.ए.एस. होऊ शकतो परंतु प्राध्यापक नाही!