महिला दिनानिमित्त यश ताम्हाणे यांच्या वतीने बाणेर परिसरातील 8 महिलांना मोफत कॉम्पुटर क्लास ची सोय

बाणेर : महिला दिनानिमित्त बाणेर येथील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोथरुड उत्तर उपाध्यक्ष यश संदीप ताम्हाणे यांच्या वतीने परिसरातील आठ गरजवंत महिलांना मोफत कॉम्प्युटर कोर्सचे सोय करून देण्यात आली. 8 मार्च महिला दिनानिमित्त परिसरातील आठ महिलांना कॉम्प्युटर कोर्सची मोफत सुविधा त्यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली.

बाणेर परिसरामध्ये अनेक गरजवंत महिलांना क्लासची फी नसल्यामुळे कॉम्प्युटर शिकता येत नाही. त्यामुळे त्यांना त्यापासून वंचित राहावे लागते. कॉम्पुटर शिक्षण ही काळाची गरज झाली आहे तसेच कॉम्पुटर कोर्सेस केल्या मुळे अनेक नोकरी च्या संधी देखील मिळतात त्यामुळे त्यांना आपल्या स्वतः आर्थिक बाबतीत स्वावलंबी होता येते.

See also  भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त "संविधान गौरव महोत्सव": सहा हजार महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा