महाळुंगे येथे माजी सरपंच उपशहर प्रमुख मयूर भांडे यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त शालेय साहित्याचे वाटप

महाळुंगे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपली लेखणी व मराठी साहित्य साता समुद्रा पार पोहोचवले अशा सहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे विक्रम सामाजिक उपक्रमांनी घेतले पाहिजे  असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिव सहकार सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब भांडे यांनी सांगितले.

महाळुंगे येथे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व  लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून राम गायकवाड (विद्यार्थी सेना जिल्हा संघटक) , भानुदास पानसरे जिल्हा समन्वयक, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप मुरकुटे, पत्रकार केदार कदम, नंदकिशोर लोंढे, विभाग प्रमुख महेश सुतार, शांताराम पाडळे (पोलीस पाटील) , तुषार हगवणे, माजी उपसरपंच,पांडुरंग पाडळे, ज्येष्ठ नागरिक संघ अशोक कोळेकर, बाळासाहेब कोळेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. महापुरुषांची जयंती पुण्यतिथी ही सामाजिक उपक्रमातून साजरी करण्यात यावी हा उद्देश सामाजिक संवेदना दाखवणारा आहे असे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजित करण्यासाठी माजी सरपंच उपशहरप्रमुख मयूर भांडे, संकेत लोंढे, दत्ता खैरे, गौरव पाडळे, निलेश गुजर, अशोक पवार, आनंद भांडे, महेश बाळासाहेब भांडे, ऋतिक भांडे,  करण भांडे, आदेश भदरगे, अभिषेक भांडे, अविनाश्  आंबुरे, गौरव् जाधव, अनिरुद्ध गवळी, सौरभ राजगुरु, संकेत डेंगाळे, सिद्धेश गोलांडे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे नियोजन महाळुंगे गावचे माजी सरपंच मयूर भांडे यांनी केले होते.

See also  शिंदे गटातील खासदार भाजपाच्या तिकिटावर उभे राहिल्यास त्यांच्या सोबतचे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या कडे वळतील -जयंतराव पाटील