पुणे: गुन्नेबो (Gunnebo) ही स्टीलेज आणि चबसेफ्ससारख्या (Chubbsafes) ठळक ब्रॅण्ड्समार्फत भारतीय ग्राहकांना गेल्या ९० वर्षांहून अधिक काळापासून सेवा देणारी आघाडीची फिजिकल सिक्युरिटी सोल्यूशन्स कंपनी आहे. १ ते १४ ऑगस्ट या काळात कंपनी ‘स्टीलेज महोत्सव’ हे आपले प्रमुख अभियान राबवत आहे. बीआयएस मानकांबाबत तसेच बीआयएस प्रमाणित तिजोऱ्या, स्ट्राँग-रूम दरवाजे व व्हॉल्ट्स यांबाबत दागिने व्यावसायिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे या अभियानामागील उद्दिष्ट आहे. हे अभियान १००हून अधिक शहरांमध्ये राबवले जाणार आहे, त्यामुळे फिजिकल सिक्युरिटी सोल्यूशन्स उद्योगातील सर्वांत मोठ्या प्रत्यक्ष उपक्रमांमध्ये या अभियानाचा समावेश होणार आहे.
बीआयएस-प्रमाणित सुरक्षितता उत्पादने वापरण्याच्या महत्त्वाबद्दल दागिने व्यावसायिकांना शिक्षित करणे तसेच अंतिम वापरकर्त्यांना (एण्ड-यूजर्स) त्यांच्या दागिन्यांच्या दुकानांसाठी योग्य तिजोऱ्या, व्हॉल्ट्स आणि उच्च सुरक्षाप्राप्त कुलपे निवडण्यास मदत करणे हे ‘स्टीलेज महोत्सव’चे ध्येय आहे.
राष्ट्रव्यापी ‘स्टीलेज महोत्सव ’चा भाग म्हणून गुन्नेबोच्या चॅनल पार्टनरच्या मदतीने 12 ऑगस्ट , रोजी पुणे येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दागिने व्यावसायिकांना व्यवसायाची सुरक्षितता वाढवण्याबद्दल प्रमाणित उत्पादनांची भूमिका समजावून देण्यासाठी या कार्यक्रमात थेट प्रात्यक्षिके, तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या चर्चा आणि संवादात्मक सत्रे यांचा समावेश करण्यात आला होता. दृश्यात्मकता व संवाद वाढवण्यासाठी या उपक्रमाला प्रत्यक्ष ब्रॅण्ड अॅक्टिव्हेशन्स, विशेषरित्या डिझाइन केलेल्या उत्पादन व्हॅन्स यांची जोड देण्यात आली. याशिवाय प्रमुख शहरांमधील ब्रॅण्ड स्टोअर्समध्ये उत्पादनांची प्रदर्शने करण्यात आली.
गुन्नेबो सेफ स्टोरेजचे आशिया विभागातील मार्केटिंग व उत्पादन व्यवस्थापन प्रमुख अनिर्बान मुखुटी या अभियानाबद्दल म्हणाले: ” स्टीलेज महोत्सव’ हे भारतातील दागिने व्यावसायिकांशी जोडून घेणारे तसेच बीआयएस प्रमाणित सुरक्षितता उत्पादनांबद्दल जागरूकता निर्माण करणारे अभियान आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील प्रत्यक्ष अभियान फिजिकल सिक्युरिटी सोल्यूशन्स उद्योगात प्रथमच होत आहे. आमच्या सर्व चॅनल पार्टनर्सच्या सक्रिय पाठिंब्यामुळे आम्ही हे साध्य करू शकलो. भारतातील प्रत्येक प्रमुख शहरातील दागिने व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट या अभियानाने ठेवले आहे.”येत्या काही दिवसांत ‘स्टीलेज महोत्सव’ भारतातील सर्व प्रदेशातील प्रमुख शहरांमध्ये पोहोचणार आहे आणि देशभरातील दागिने व्यावसायिक समूहांना बीआयएस-प्रमाणित सिक्युरिटी सोल्यूशन्सची ओळख करून देणार आहे.
येत्या काही दिवसांत ‘स्टीलेज महोत्सव’ भारतातील सर्व प्रदेशातील प्रमुख शहरांमध्ये पोहोचणार आहे आणि देशभरातील दागिने व्यावसायिक समूहांना बीआयएस-प्रमाणित सिक्युरिटी सोल्यूशन्सची ओळख करून देणार आहे.