सोमेश्ववाडी : देवस्थान ट्रस्ट सोमेश्वरवाडी, विठ्ठल सेवा गणेशोत्सव मंडळ (एक गाव एक गणपती), विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमेश्वरवाडी, राजे शिवराय प्रतिष्ठान पेठ जिजापूर पाषाण, सकल हिंदू समाज यांच्या वतीने आणि सचिन दळवी मित्रपरिवार यांच्या सौजन्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिवस (हिंदू साम्राज्य दिन उत्सव) सोमेश्वरवाडी (पेठ जिजापूर), पाषाण येथे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या व्याख्यानांनी साजरा करण्यात आला.
यावेळी इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुणांपुढे मांडला. शिवरायांच्या जीवनातील एक एक प्रसंग सांगत उपस्थित शिवप्रेमींची टाळ्यांची दाद मिळवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय बिकट परिस्थितीत स्वराज्य निर्माण करत आपल्या सर्वांनाच ताट माननीय कसे जगावे हे शिकवले.
कार्यक्रमाचा शेवट सर्वांनी शिव वंदना म्हणून केला.