शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्य संघटक पदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब भांडे यांचा मुळशी तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने सत्कार

पौड : शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष मुळशी तालुक्याच्या वतीने पौड येथे शिवसेना राज्यसंघटक पदी बाळासाहेब भांडे यांची निवड झाल्या बद्दल मुळशी तालुक्याच्या वतीने सत्कार जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे ,शिवआरोग्य सेना जिल्हाप्रमुख आबासाहेब शेळके ,तालुकाप्रमुख सचिन खैरे, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य राम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी  राज्य संघटक बाळासाहेब भांडे म्हणाले, आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत जुन्या नवीन शिवसैनिकांनी कंबर कसून भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे. यावेळी शिव आरोग्य सेना तालुका संघटक माऊली डफळ ,शिवसेना समन्वयक नामदेव टेमघरे, उप तालुकाप्रमुख पांडुरंग निवेकर, महिला आघाडी उपतलुका संघटक मंजुश्री ढमाले, राणी शिंदे , शिवाजी बलकवाडे ,मुकेश लोयरे ,संकेत लोंढे, दत्ता देवकर, नितीन लोयरे, सौरभ साळुंके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

See also  अमोल बालवडकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सुसगाव परिसरात ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती