बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पेढे वाटून मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या लढ्याचे यश साजरे

बाणेर : संघर्षयोध्दे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मुंबई येथे आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणादरम्यान विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत मराठा आंदोलनाच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. मुंबई आंदोलनातील झाल्याबद्दल बाणेर बालेवाडी औंध पाषाण सुस महाळुंगे सुतारवाडी सोमेश्वरवाडी बावधन परिसरातील मराठा बांधवांनी बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा केला.

मुंबई येथील मराठा आंदोलन दरम्यान या परिसरातून लाखो रुपयांचे अन्नधान्य व साहित्य नागरिकांना सहाय्य म्हणून देण्यात आले होते. आंदोलनाच्या मागण्या मान्य केल्याबद्दल यावेळी  मनोज जंगी पाटील व शासनाचे मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. मराठा बांधवांनी यावेळी गुलाल उधळून तसेच फटाके वाजवत, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

See also  पुणे महानगरपालिका क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघावर विजय मिळवत विजेतेपद पटकावले