पुणे महानगरपालिका क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघावर विजय मिळवत विजेतेपद पटकावले

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेत पुणे महानगरपालिका क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघावर विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

पुणे मनपा संघाने 10 षटकांत 4 गडी गमावून 108 धावा केल्या.
कपिल भापकर – 33 धावा (16 चेंडू)
किरण शेवाळे – 39 धावा (14 चेंडू)

प्रत्युत्तरात पिंपरी चिंचवड मनपा संघाने 8 गडी गमावून 71 धावा केल्या.अतुल धोत्रे यांनी 2 षटकांत 5 धावा देत 3 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली.

See also  ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र ताम्हाणे यांना बालगंधर्व पुरस्कार प्रदान