मांजरी : पद्म श्री अनाथांची माता कै.सिंधुताई सपकाळ यांच्या मांजरी येथील अनाथ आश्रमामध्ये डॉक्टर दिलीप मुरकुटे यांच्या हस्ते गणपती आरती घेण्यात आली घेण्यात आली.
यावेळी कै. सिंधुताईंची मुलगी ममता सकपाळ, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे, दीपक गायकवाड, पुणे बुलेटिनचे संपादक केदार कदम, जीवन गाडे आदी उपस्थित होते.
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या मांजरी येथील अनाथाश्रमामध्ये गणपती उत्सवानिमित्त विविध मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीमध्ये श्री गणरायाची आरती व विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अनाथ आश्रमातील विद्यार्थी व सहकारी देखील उपस्थित होते.