औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत  ४९४८३ श्री गणेश मूर्तींचे घाटावर कृत्रिम हौदामध्ये विसर्जन तर १३५९४ श्री गणेश मूर्तींचे दान

औंध : औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत  ४९४८३ श्री गणेश मूर्तींचे घाटावर कृत्रिम हौदामध्ये विसर्जन झाले तर १३५९४ श्री गणेश मूर्तींचे दान संकलन केंद्रावर करण्यात आले असे एकूण ६३०७७ श्री गणेश मूर्तींचे विसर्जन/संकलन क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत झाले.

सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मा. संदीप कदम उप आयुक्त घनकचरा व्यस्थापन, मा. अरविंद माळी उप आयुक्त परिमंडळ क्र. २, मा. अविनाश सकपाळ उप आयुक्त तसेच मा. गिरीष दापकेकर महापालिका सहाय्यक आयुक्त औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांच्या मार्गदर्शनाने औंध, पाषाण, सुतारवाडी, बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे ह्या भागामध्ये स्वच्छता करिता रात्र सत्रात देखील सफाई सेवकांची नेमणूक करून सर्व मुख्य रस्ते, गणेश मंडळे ठिकाणे परिसर स्वच्छता करून घेण्यात येत होती.  पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बहुतांश भाविकांनी ह्या वर्षी शाडू मातीच्या गणेश मूर्तीची मोठ्या प्रमाणात स्थापना केली असल्याचे आढळून येत होते.

गणेश भक्तांना श्री गणेशाचे विसर्जन करण्याकरिता औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाने १२ ठिकाणी विसर्जन घाटावर कृत्रिम हौदाची व १७ ठिकाणी गणेशाच्या मूर्ती दान स्वीकारण्यासाठी संकलन केंद्राची उभारणी केली होती. तसेच विसर्जनाकरिता घाटावर व संकलन केंद्रावर येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयच्या वतीने स्वच्छता, विद्युत रोषणाई, निर्माल्य संकलन, स्वच्छतागृहाची देखील व्यवस्था करण्यात आलेली होती. विसर्जन घाटावरील महानगरपालिकाची सर्वोतोपरी व्यवस्था बघून औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाला जोडून असलेल्या पिंपरी चिंचवड भागातील सांगवी, पिंपले गुरव, पिंपले निलख, भागातील नागरिकदेखील खास करून बाणेर स्मशानभूमी, राजीव गांधी औंध व शांता आपटे घाट बोपोडी याठिकानी गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात येत होते. औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत  ४९४८३ श्री गणेश मूर्तींचे घाटावर कृत्रिम हौदामध्ये विसर्जन झाले तर १३५९४ श्री गणेश मूर्तींचे दान संकलन केंद्रावर करण्यात आले असे एकूण ६३०७७ श्री गणेश मूर्तींचे विसर्जन/संकलन क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत झाले. ६७.१५६ मे.टन निर्माल्य आरोग्य विभागामार्फत गोळा करण्यात आले.

See also  जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषद २०२४ संपन्न, ७२ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

संपर्ण गणेशोत्सव व विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे याकरिता औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय अधिकारी श्री. विजय खेवजी भोईर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, श्री. दिपक लांडे उपअभियंता, श्री. विजय वाघमोडे उपअभियंता यांच्या नियंत्रणाखाली सर्व कनिष्ठ अभियंता/ आरोग्य निरीक्षक/मोकादम/सफाई सेवक, आरोग्य विभाग, मोटार वाहन विभाग, स्थापत्य विभाग, विद्युत विभाग पहाणी उत्कृष्ट कामकाज केले.