महिन्यातून तीन वेळा चेंबर बदलण्याची वेळ पालिकेवरती, नागरिकांच्या पैशाचा दुरुपयोग कधी थांबणार ‘आप’चेप्रशांत कांबळे यांचा सवाल

कात्रज : आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रोडवर मधोमध असलेले पावसाळी चेंबर वारंवार तुटत असल्यामुळे नागरिकांच्या जीवाशी पुणे महानगरपालिका थेट खेळ करत आहे. केवळ एका महिन्यात तीन वेळा चेंबर बसवावे लागते, यावरून पालिका व ठेकेदारांच्या भ्रष्टाचाराचे आणि निकृष्ट कामाचे थरारक वास्तव उघड झाले आहे.

पालिकेतील अभियंते आणि ठेकेदार नागरिकांचे जीव धोक्यात घालून, त्यांच्या पैशांचा अपव्यय करून, पुणे महानगरपालिका भ्रष्टाचाराचे अड्डे चालवत आहे असा आरोप आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.

महापालिका उपाययोजना करण्याऐवजी गप्प बसून या गैरव्यवहाराला अभय देत आहे. नागरिकांचा विश्वासघात करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई झाली नाही, तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल.

आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या पैशाची लूट आणि जीवाशी खेळ त्वरित थांबवावा. ठेकेदार व संबंधित अभियंत्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन पालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन उभारले जाईल.

See also  प्रदेश प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ॲड डॉक्टर मधुकर मुसळे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल