पाषाण येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न

पाषाण : रा. स्व. संघ विद्यापीठ भागातील बाणेर बालेवाडी, पाषाण, आणि सुस नगराचा एकत्रित विजयादशमी उत्सव पाषाण येथील ज्ञानदीप मंगल कार्यालयात संपन्न झाला. उत्सवाच्या प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध डॉक्टर सौ. तेजल द्रविड होत्या. तर संघाचे महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री. हेमंत हरहरे प्रमुख वक्ते होते. व्यासपीठावर ह्यांच्या सोबत विद्यापीठ भागाचे सह संचालक श्री. सुभाष कदम तर पाषाण नगर संघचालक श्री. राजेंद्र सुतार होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर सर्वांनी शस्त्र पुजन केले. उपस्थित स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला प्रदक्षिणा संचलन करत उत्सवाची सुरुवात केली. त्यानंतर स्वयंसेवकांनी घोष, योगासन, व्यायामयोग, दंड प्रहार आणि नियुद्धाचे प्रात्यक्षिके सादर केलीत.
डॉ. द्रविड ह्यांनी कोरोना काळातील संघाच्या विविध सेवा कार्याची प्रशंसा केली. कोरोनाने समाजाला नवीन शिकवण दिली. आरोग्य आता वैयक्तिक बाब उरली नसून ती आता सामाजिक बाब झाली आहे. त्यांनी समाजाच्या आरोग्यासाठी सर्वांनी नियमित व्यायाम, वेळेवर सात्त्विक भोजन आणि वेळेवर विश्रांती घेण्याचे आवाहन केले.


श्री. हरकरेंनी सध्याच्या आव्हानात्मक काळात संघाचे काम फारच महत्त्वाचे आहे असे सांगितले. समाजातील विघटनकारी तत्वांपासून संघटित हिंदूच सामना करू शकतो. विभिन्न काळात नवनवीन समस्या समाजासमोर येत असतात त्याला तोंड द्यायला संघाला बदलावे लागेल. येणारे चार वर्षे हिंदूंसाठी फारच आव्हानात्मक राहतील. त्यासाठी संपूर्ण हिंदुंनी एकत्र येणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले.

उत्सवाला ४०० गणवेशधारी स्वयंसेवक तर ४०० नागरिक उपस्थित होते.

See also  शिवसेना शाखा सुतारवाडी व सन वाईन प्रीस्कूल च्यावतीने वृक्षरोप वाटप