चार चाकी गाड्यांच्या उजेडात उरकावा लागला अंत्यविधी ; पाषाण स्मशानभूमी अंधारात

पाषाण : पाषाण स्मशानभूमी विद्युत व्यवस्था नसल्याने अंधारात अंत्यविधी करण्याची वेळ मृत व्यक्तीच्या नातेवाईकांवर आली. यावेळी पाषाण स्मशानभूमी मध्ये चार चाकी गाड्यांच्या उजेडा मध्ये अंत्यविधी करावा लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

दिनांक 21 मार्च 2024 रोजी पाषाण स्मशानभूमी मध्ये एका सोसायटी मधील महिलेचा अंत्यविधी करताना सर्व लाईट बंद होत्या प्रकाशाची काहीही सोय नसल्यामुळे उजेडासाठी गाडीच्या लाईट चा उपयोग करून अंत्यविधी करण्यात आला. शिवसेना शाखा सुतारवाडी शाखाप्रमुख अमोल फाले यांनी लाईट साठी प्रयत्न केला . मग शेवटी चार चाकी गाडीच्या लाईट प्रकाशमध्ये अंत्यविधी पार पाडण्यात आला.

पाषाण स्मशानभूमी मध्ये विद्युत व्यवस्था सुरळीत करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. दरम्यान औंध क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने विद्युत व्यवस्था करून दिली.

See also  पुणे महानगरपालिकेच्या पाण्याचा बाजार मांजरीतील नागरिकांनी टँकर अडवून रोखला; पाणी विक्री होत असल्याचा आरोप