बाणेर : बाणेर पाषाण लिंक रोड येथील ड्रेनेज लाईनच्या झाकणामधून सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न गंभीर म्हणजे झाला आहे. महिनाभर या परिसरामध्ये सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.
पावसाळी गटारांची स्वच्छता तसेच ड्रेनेज लाईनची स्वच्छता योग्य रीतीने झाली नसल्याने बाणेर पाषाण लिंक रोड येथील ड्रेनेज लाईन मधून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर येत आहे. मुख्य रस्त्यावर पाणी येत असल्यामुळे वाहनांमुळे नागरिकांच्या अनेकदा अंगावर उडत असून याचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे.
या परिसरातील दुकानांच्या समोर ड्रेनेजच्या चेंबर मधून बाहेर पडणारे सांडपाणी वाहत असल्यामुळे या परिसरात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करण्यात यावी तसेच रस्त्यावर येणारे सांडपाणी थांबवण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्या अशी मागणी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन च्या वतीने करण्यात आली आहे.