पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान स्व. लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष *अरविंद शिंदे व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी गांधी विचारांना उजाळा देताना म्हणाले की,‘‘सध्या समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते थांबविण्या करीता महात्मा गांधींनी घालून दिलेल्या अंहिसेच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. महात्मा गांधींचे विचार व काँग्रेसची मूल्य यांच्या आधारावर भारत देशाची वाटचाल झाली पाहिजे. लालबहाद्दूर शास्त्री यांचा ‘जय जवान जय किसान’ चा नारा देशात पुन्हा एकदा पुकारण्याची आवश्यकता आहे. सध्याचे सत्ताधारी असंविधानिकपणे देशाचा कारभार चालवित आहेत. त्याकरीता संविधानाची व गांधी विचारांची जन जागृती करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमुद केले.’’
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक रफिक शेख, अजित दरेकर, उस्मान तांबोळी, प्राची दुधाणे, मेहबुब नदाफ, सुजित यादव, डॉ. राहुल सावंत, द. स. पोळेकर, अनुसया गायकवाड, प्रकाश पवार, मारूती राऊत, माधवराव बारणे, संदिप मोकाटे, अनिल पवार, सुनील काकडे, अकबर शेख, रेखा जैन, सुरेख नांगरे, जीवन चाकणकर, आसिफ शेख, कुणार चौबारे, विनायक तामकर, अशोक लोणकर, महेश विचारे, रामदास केदारी, हर्षद हांडे, ॲड. बाळासाहेब बाणखेले, दिलीप लोळगे आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.