खडकवासला : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त खडकवासला काँग्रेसतर्फे सिंहगड रोड येथे अभिवादन कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग नाना चव्हाण पाटील यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केले. यावेळी ते म्हणाले की, “बंदुकीच्या गोळीने माणसं मारता येऊ शकतात, पण सत्य कधीही संपविता येऊ शकत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांनी १९४८ साली त्यांची हत्या केली. पण, महात्मा गांधींचे विचार आजही देशाच्या कणाकणात जिवंत आहेत.”
कार्यक्रमात माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेलाही अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजातील तरुणांमध्ये रक्तदानाची प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन खडकवासला युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित जाधव यांनी या शिबिराचे आयोजन केले.शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या वेळी वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य मिलिंद पोकळे, पुणे शहर काँग्रेस पर्यावरण उपाध्यक्ष धनंजय पाटील, खडकवासला काँग्रेस उपाध्यक्ष संजय अभंग, किसान काँग्रेस उपाध्यक्ष शंकरराव दांगट, युवक अध्यक्ष विश्वजित जाधव,रघुनाथ यादव, बालाजी जाधव, आशिष आमले, राकेश सरोदे, रोहन सरोदे, विजय गायकवाड,केशव पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
घर ताज्या बातम्या महात्मा गांधींचे विचार आजही देशाच्या कणाकणात जिवंत – श्रीरंग चव्हाण पाटील; सिंहगड...






















