मनाचे श्लोकांचे पाठांतर ही काळाची गरज – स्वामी गोविंददेव गिरी

बाणेर : विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर श्री.भगवती सेवा आश्रम व जीवन कौशल्ये विकास यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवाच्या पर्वात पर्यावरण पूरक  गणेशमुर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा विविध शाळेतून आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात ८० सेवा वस्तीतील २२ शाळेत २० क्विंटल शाडू मातीचा वापर करण्यात आला. कार्यशाळेत उत्कृष्ट तीन मुर्ती साकारणाऱ्या मुला-मुलींना स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते व  आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत ‘शिवप्रताप’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संबधीत शाळेतील शिक्षकांचा शाल देऊन गौरवण्यात आले. विविध सामाजिक कार्याचे आश्रयदाते राजेंद्र तापडिया व अशोक नवाल यांचा सत्कार स्वामीजींच्या शूभास्ते झाला.

सेवा संस्थेच्या विविध उपक्रमा बरोबरच मागील काळात श्री.रामदास स्वामी रचित मनाचे श्लोकांच्या १ लाख २० हजार पूस्तिकेचं वाटप विविध शाळेतील मुलांना करण्यात आले. या
उपक्रमात पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली.त्यातील यशस्वी मुलांना सायकलींचे वाटप गुरुपोर्णिमे च्या दिनी करण्यात आले. या उपक्रमातील यशस्वी मुलगी चि.नम्रता माणिक अंभोरे वय १० वर्षे हिने स्वामीजी समोर मुख्दगत पाठांतर दाखवले. त्याचे कौतुक स्वामीजींनी केले. स्वामी श्री.गोविंदगिरीनी मनाचे श्लोकांचे संस्कार बालवयात व्हायलाच हवेत. त्याचा अर्थ अंतरमूख करणारा आहे. व त्यातून भावी जीवनाला यशस्वी दिशा देण्याचे कार्य घडण्याचे सामर्थ्य त्यात आहे असे सांगितले.

या कार्यक्रम यशस्वीते साठी गिरीधर राठी,प्रकाश बोकील,डॉ. श्याम कुलकर्णी, उल्हास चित्रे यांचा सहभाग होता.

See also  कोथरुड येथे दिव्यांग मतदार जन जागृती यात्रा संपन्न