भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त, क्रीडा मंत्रालयाची मोठी कारवाई

नवी दिल्लीः भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संजय सिंह यांनी यावर्षाच्या अखेरीस उत्तर प्रदेशातील नंदिनीनगर येथे १५ व २० वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होतील, अशी घोषणा केल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाची नवीन कार्यकारिणीच बरखास्त केली असून नवे अध्यक्ष संजय सिंह यांची मान्यता रद्द केली आहे.


भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. हा वाद सुरू असतानाच भारतीय कुस्ती महासंघाच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे अध्यक्षपदाच्यानिवडणुकीत विजयी झाले आणि भारतीय कुस्तीमहासंघाचे प्रमुख बनले.

संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्याअध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मोठा गदारोळ उडालाहोता. कुस्तीपटूंनी संजय सिंह यांच्या निवडीला तीव्र विरोध केला. काही कुस्तीपटूंनी तर या निवडीच्या विरोधात कुस्तीतून निवृत्तीही जाहीर केली. तर दुसरीकडे ब्रिजभूषण सिंह आणि संजय सिंह यांनी कुस्तीपटूंविरोधात तीव्र प्रतिक्रिया देणे सुरूच ठेवले.अशातच भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजयसिंह यांनी यावर्षाअकेरीस १५ वर्षाखालील व २० वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा उत्तर प्रदेशातील नंदिनीनगर येथे होतील, अशी घोषणा केली.नंदिनीनगर हा ब्रिजभूषण सिंह यांचा गड मानला जातो. कुस्तीपटूंनी या घोषणेलाही विरोध केला.

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुस्तीपटूंना पुरेशीसूचना न देता आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या घटनेतील तरतुदींचे पालन न करता घाईघाईत याराष्ट्रीय स्पर्धेची घोषणा करण्यात आली. भारतीय कुस्ती महासंघाच्या घटनेतील कलम ३ (ई)नुसार यूडब्लूडब्ल्यूच्या नियमांनुसार कार्यकारी मंडळाने निवडलेल्या ठिकाणी वरिष्ठ, ज्युनियर आणि सबज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपचे आयोजन करणे आवश्यक आहे. स्पर्धा आयोजित करताना खेळाडूंना किमान १५ दिवसांचा अवधी देणे आवश्यक आहे,असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. परंतु नियमांचे पालन न केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाची नवीन कार्यकारिणीच बरखास्त करून संजय सिंह यांची मान्यताही रद्द केली आहे.भारतीय कुस्ती महासंघाचे नवीन कार्यकारी मंडळमाजी पदाधिकाऱ्यांच्या पूर्ण नियंत्रणात आहे. तसेच क्रीडा संहितेकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.महासंघाचा कारभार माजी पदाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या जागेतूनच चालवला जात आहे. ज्या जागेवर खेळाडंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. आणि न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरू आहे असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.

See also  वैष्णवांच्या मेळ्यासमवेत शासकीय योजनांची माहिती देणारी 'संवादवारी'