शिंदे गटाची ‘ती’ जाहिरात भाजपला टोचणारी

मुंबई : राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे आशा आशायाची जाहिरात आज शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून लावण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न शिंदेंकडून करण्यात आला आहे. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला डिवचण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ज्या जाहिराती केल्या आहेत, त्या योग्य नाहीत. यात एकनाथ शिंदेंना सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून दाखवण्यात आलं आहे. परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राला योग्य दिशा द्यायाची आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा एकत्रित विचार होणं अपेक्षित आहे. एकमेकांना कमी जास्त दाखवण्यासाठी कुणी खतपाणी घालत असेल तर त्याला बळी पडू नये. त्यामुळे वातावरण प्रदुषित होईल. हे मात्र नक्कीच असं भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेकडून आज बहुतांश वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात देण्यात आली असून याध्यमातून सरकारच्या कामगिरीवर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट तुलना कधीही करण्यात आली नव्हती, मात्र जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के लोकांची पसंती असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.

See also  जलतरण तलावात क्रिकेट खेळून मनसेचे पालिके विरोधात केले हटके आंदोलन