महाळूंगे येथे जीवन कौशल्य विकास व भगवती सेवा आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आकाश कंदिल निर्मिती कार्यशाळा

महाळुंगे: वस्ती विभागातील म.न.पा. शाळा महाळूंगे येथे जीवन कौशल्य विकास व भगवती सेवा आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आकाश कंदिल निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यात ५० इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनीसहभाग घेतला होता.
  या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक भिमराव चव्हाण, सहशिक्षक निवृतीराव शेळकंदे यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळा यशस्वितेसाठी  गिरीधर राठी,डॉ.श्याम कुलकर्णी, प्रकाश बोकील, श्रीरंग कूरे,हअशोक अधिकारी, वळसंगकर यांनी प्रयत्न केला.या नाविन्यपूर्ण कार्यशाळे मुळे बालकांचे हस्त कौशल्ये वृध्दींगत होण्यास मदत होईल.

See also  मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे-आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या सूचना ;पुनर्रचित कोविड टास्क फोर्सची बैठक