ग्रँड शेरेटन येथील टॅायरुम ह्या पब मध्ये शासनाचे नियम डावलून रात्री दीड नंतर देखील सर्रास दारू विक्री ..
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला पर्दाफाश

पुणे : बॉम्बे प्रोहिबीशन अॅक्ट १९४९ मधील कलम ११.३ नुसार व शासन धोरणानुसार रात्री १:३० वाजल्यानंतर कुठल्याही लायसेन्स धारक आस्थापनांमध्ये मद्य विक्री करण्यास मनाई आहे तरीही आज रात्री दीड नंतर ” टॅायरुम ” या पब मध्ये रात्री उशिरा ३.०० पर्यंत उघडपणे मद्य विक्री होत होती, याबाबत मनविसे पदाधिकाऱ्यांनी तत्काळ उत्पादन शुल्क विभागाच्या नम्रता वाघ यांना तक्रार केली व पार्टी सुरू असताना विहित कालावधी नंतर मद्य विक्री होत असल्याचे व्हिडिओज आणि मद्य खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या, तदनंतर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाड मारून पब बंद केला. आताही रात्री उशिरापर्यंत त्याठिकाणी कारवाई सुरू आहे.

मनविसे सातत्याने पब क्लब च्या गैरप्रकारांबाबत आक्रमकपणे आवाज उठवत आहे, या आधी देखील सदर पब विरोधात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे तरीही आज देखील ह्या “टॅायरुम” मध्ये कायद्याचा भंग करून सुरू असलेल्या मद्य विक्री सर्रास होती ही बाब मनविसेने प्रशासनास निदर्शनास आणून दिली.

तरी या टॅायरुम आस्थापनेवर उत्पादन शुल्क विभागाने तत्काळ कठोर कारवाई करून हा पब कायमचाच सिल करावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना करत आहे. यापुढेही मनविसे अशा पब क्लब मधील गैरप्रकाराविरोधात आक्रमकतेने लढा देणार आहे.

मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलन प्रसंगी राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे,विभाग अध्यक्ष हेमंत बोळगे, आशुतोष माने, केतन डोंगरे, निलेश जोरी, संतोष वरे, विभाग सचिव मयुर शेवाळे, उपाध्यक्ष तेजस उमाप व मोठ्या संख्येने पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

See also  निवासी मिळकत धारकांना 40 टक्के कर सवलतीसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वाढ मिळावी सुनील माने यांची मागणी