धर्म हि मार्केटिंग करण्याची गोष्ट नाही- सुषमा अंधारे ; पाषाण बाणेर लिंकरोड येथे डॉ.दिलीप मुरकुटे यांच्या वतीने दिवाळी सरंजाम वाटप

पाषाण : ‘धर्म’ हि मार्केटिंग करण्याची गोष्ट नाही. तर धर्म ही मानवतेचा संवेदनशील संदेश देण्यासाठी असतो असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक ९ बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी मधील नागरिकांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने बाणेर-पाषाण लिंक रोडवरील बालाजी चौक येथे दिवाळी सरंजाम वाटप तसेच स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमातील मुलांना दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम आमदार, शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी सचिन आहेर यांची बेस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप मुरकुटे पाटील म्हणाले, “दिवाळीचा सण आपण सर्वजण उत्साहात साजरा करतो. परिसरातील नागरिकांची दिवाळी अधिक गोड आणि आनंदी व्हावी म्हणून हा सरंजाम वाटप उपक्रम आम्ही राबवितो. नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी पाठीशी असल्याने समाजसेवेचे असे उपक्रम सातत्याने करत राहतो. बाणेर गावातील मंदिरासाठी निधी देण्याबरोबरच बाणेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारले जाणार असल्यास, त्यासाठीही शिवसैनिक म्हणून मी मोठा निधी देण्याचा संकल्प करतो.”

यावेळी बोलताना शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, “महागाई वाढत असताना अंधभक्त सर्व स्वीकारत आहे व जनता देखील सहनशील झाले आहे. आपल्यावर होत असलेला अन्याय सहनशीलता बाजूला ठेवून त्याचा विरोध करण्यासाठी जनतेने जागरूक झाले पाहिजे. मानवतेचा संवेदनशील धर्म डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या कार्यातून दिसून येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ते पुढाकार घेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. दिलीप भाऊंचा सरंजाम नागरिकांची दिवाळी अधिक गोड करणारा आहे.”

सचिन आहेर म्हणाले, “दिलीप भाऊ मुरकुटे हे फक्त दिवाळीपुरतेच नव्हे, तर वर्षभर समाजोपयोगी कार्य करणारे नेतृत्व आहे. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक चळवळीत सक्रिय राहून ते कार्य करतात. समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव ठेवून दीपोत्सवासारख्या कार्यक्रमातून त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पक्षनिष्ठ शिवसैनिक म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून काम कसे करावे, याचे उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे.”

या कार्यक्रमास समाजसेविका ममताताई सिंधुताई सपकाळ, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, ॲड. पांडुरंग थोरवे, जयेश मुरकुटे, गुलाबराव तापकीर, संजय निम्हण, महेश सुतार, ह.भ.प. पांडुरंग दातार, राजेश विधाते, ह.भ.प. मारुती कोकाटे, संतोष तोंडे, लक्ष्मण सायकर, बबनराव चाकणकर, ह.भ.प. नामदेव भेगडे, ॲड. माणिक रायकर, संतोष तापकीर, माजी सरपंच नामदेव गोलांडे, ॲड. दिलीप शेलार, प्रवीण डोंगरे, धनंजय भोते, सोमनाथ कोळेकर, नितीन शिंदे, रखमाजी पाडाळे, किरण मुरकुटे, ओम बांगर, श्याम बालवडकर, जंगल रणवरे, जीवन चाकणकर, अर्जुन शिंदे, अर्जुन ननवरे, मधुकर निम्हण, हिरामण तापकीर, अशोक दळवी, ह.भ.प. गणेश मुरकुटे पाटील, सुभाष मटकर, सामाजिक कार्यकर्त्या युगंधरा मुरकुटे, ज्योती चांदेरे, संजय ताम्हाणे, ॲड. विशाल पवार, जीवन खेडेकर, अविनाश गायकवाड तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  महाळुंगे येथील रस्त्यांमध्ये असलेले अडथळे, दगड काढण्याची मागणी