बाणेर च्या श्रीराम समर्थ पतसंस्थेचा राज्यस्तरीय “दीपस्तंभ पुरस्काराने” सन्मान

बाणेर : आंतराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने यावर्षीचा राज्यस्तरीय “दीपस्तंभ पुरस्कार” श्रीराम समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेला फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

श्रीराम समर्थ पतसंस्थेने महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभा प्रमाणे कार्य करून सहकार चळवळीला मार्गदर्शक दिशा दर्शविली आहे असे काकासाहेब कोयटे यांनी यावेळी सांगितले.

संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक दत्तात्रय तापकीर, कार्याध्यक्ष विवेक कळमकर, संचालक सुधाकर धनकुडे, हृषिकेश तापकीर, मुख्य व्यवस्थापक संतोष कोलते यांनी स्विकारला.

संस्थेचे संस्थापक दत्तात्रय तापकीर यांनी सांगितले की, संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे संचालक, स्टाफ व खातेदार यांचा मोलाचा वाटा आहे, त्यांच्यामुळेच आज संस्थेला पुरस्कार प्राप्त झाला आहे.

See also  हिंजवडी वाहतूक विभाग अंतर्गत अवैद्य प्रवासी वाहतुकीला कोणाचा वरदहस्त? वाहतूक विभागाच्या चौकी जवळच राजरोज सुरू आहे अवैध प्रवासी वाहतूक