दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगू लागला आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी विरूद्ध भारतीय जनता पक्ष असा निकराचा सामना होत आहे. या रंगतदार लढतीत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.
उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठिंब्याचे पत्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना दिले. महाराष्ट्रातील पालकमंत्री पदाच्या नियुक्त्यांवरून शिंदे नाराज आहेत, त्यामुळे ते त्यांच्या दरे या गावी निघून गेले आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर, दुसरीकडे शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे नाराजीच्या चर्चा फोल ठरल्या आहेत.