अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र योगेंद्र पवार हे शरद पवारांच्या भेटीला

पुणे : अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बर्याच घडामोडी झाल्या. दोन गट तयार झाल्यानंतर अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे.

यातच आता अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पवार यांचे पुत्र योगेंद्र पवार हे आज व्हाय वी सेंटर येथे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.

अजित पवारांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून फारकत घेत शिंदे सरकारमध्ये गेलेत. यात आता अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पवार यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. तर त्यांचे पुत्र म्हणजे अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार सध्या शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे योगेंद्र पवार शरद पवार गटात सामील होणार का ? तसेच बारामतीतील राजकीय समीकरणांवर याचा कितपत परिणाम होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

See also  अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर वतीने शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव ९५ स्वराज्य रथ यांचे स्वागत