हडपसर : स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूल डी पी रोड माळवाडी हडपसर शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरील विचार, भाषणे आणि कविता सादर केल्या. शिक्षकांनी वाचनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना दररोज वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आवडीची पुस्तके वाचून त्यांचे अनुभव शेअर केले. शाळेच्या ग्रंथालयात विशेष वाचन प्रदर्शनही भरविण्यात आले आणि विद्यार्थ्यांच्या सहाय्याने पुस्तकाची प्रतिकृती आणि वाचन दिन याची प्रतिकृती बनविण्यात आली. यासाठी अस्मिता मॅडम, सलमा मॅडम,सुनील सर,अक्षयकुमार सर, अनुराधा मॅडम,गावडे सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका , बालवाडी शिक्षका आणि सेविका,सेवक यांनी कार्यक्रमात पुस्तक वाचन करून सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक विनायक पुणेकर सरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत वाचनातून ज्ञान मिळवून जीवनात प्रगती साधावी, असे आवाहन केले.कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अक्षयकुमार सर यांनी केले. आभार प्रदर्शन सुनील सरांनी केले.