पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना चुकीच्या पद्धतीने चालू असलेल्या पाणीपट्टी वसुलीवर महापालिका लवकरच काढणार तोडगा

पुणे – पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस-महाळुंगे गावातील सर्व फ्लॅटधारक व रहिवाश्यांना अद्याप पालिकेच्या वतीने पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येत नाही तरी देखील मिळकत करपावती सोबत सरसकट महापालिकेच्या कर विभागातून पाणीपट्टी वसुलीचे काम चालू असल्याने त्याबाबत  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  कोथरुड विधानसभा उपशहर संघटीका ज्योती नितिन चांदेरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष्याचे पुणे शहर संपर्कप्रमुख गजानन भाऊ थरकुडे यांच्या  मार्गदर्शनाखाली त्याबाबत महापालिका आयुक्त यांचेकडे तक्रार केली होती.

त्याची दखल घेत पाणी पुरवठा विभाग जोशी साहेब व जगताप साहेब यांनी तक्रारीचे निवारण करून ज्या ठिकाणी पालिकेने कमी क्षमता असलेल्या पाणी टाक्या बसवलेल्या आहेत त्या सर्व टाक्यांची क्षमता वाढुन नविन टाक्या बसवण्यात येतील. तसेच सोसायटी मेंबर शी चर्चा करून संगनमताने आलेल्या तक्रारीचे निवारण केले जाणार असल्याचे सांगितले.त्या वेळी स्वातीताई सुर्यवंशी,अमोल फाले,ओंकार सुर्यवंशी,शुभम निकाळजे, व इतर नागरीक उपस्थित होते.

See also  चंद्रकांत मोकाटे यांच्यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवा मंत्री व महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी एरंडवाना परिसरात प्रचार केला