पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ कामी मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या मान्यतेने दि.०६ ऑक्टोबर,२०२५ रोजी पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे.पुणे महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे कामकाज क्षेत्रीय कार्यालया मार्फत सुरु करण्यात आलेले आहे.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) मा. श्री.ओमप्रकाश दिवटे यांनी क्षेत्रीय कार्यालय निहाय मतदार यादी विभाजनाचे कामकाजाचा आढावा घेतला. तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे कामकाज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले व सदरचे कामकाज लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.























