लोहगावात ३० हजार फुट अनधिकृत बांधकामांवर कारवाई

लोहगाव :लोहगाव मधील खेसे पार्क, फॅारेस्ट पार्क भागात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई अनधिकृत बांधकामे पाडली. सर्व्हे नं.१३३ फॅारेस्ट पार्क हवाई दलाच्या बॅाम्ब डंम्पींग ग्राऊंड जवळ, सर्व्हे नं.२५३, २५८ खेसे पार्क, या भागातील अनधिकृत बांधकामांना नोटीसेस देण्यात आल्या होत्या. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने बांधकामावर जेसीबी चालवण्यात आला.


एकूण ३० हजार फुट आरसीसी बांधकामाचे स्ट्रक्चर धाराशाही करण्यात आले. त्यात दोन ईमारती, एक हॅाटेल, पाच शेड चा समावेश आहे. या कारवाईसाठी बांधकाम विकास झोन 4 विभागामार्फत अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे, उप अभियंता एकनाथ गाडेकर, शाखा अभियंता इरफान शेख, कनिष्ठ अभियंता नितीन चांदणे व सहायक पराग गोऱ्हे यांच्या मार्गदर्शन व उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

See also  बाणेर पाषाण लिंक रोड येथील 'मिडोज हॅबिटॅट' सोसायटीमध्ये आदर्श शिक्षकांच्या हस्ते विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण