बाणेर : ज्येष्ठ नागरिक महासंघ, पुणे शहर या संस्थेचा महानंदादीप या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा बालेवाडी येथील श्री खंडेराय प्रतिष्ठान संस्थेतील सभागृहात श्री. अशोकराव मुरकुटे, अध्यक्ष, अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ, औंध यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणपतराव बालवडकर होते. या दिवाळी अंकाचे संपादन ऍड. एस. ओ. माशाळकर, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक महासंघ यांनी केले. या दिवाळी अंकासाठी महासंघाचे सचिव श्री. सूर्यकांत कलापुरे, उपाध्यक्ष श्री. हरीश पाठक, खजिनदार श्री. शरद जाधव, उपसचिव डॉ. जनार्दन कदम, डॉ. मिना विधळे, डॉ. राजेश देशपांडे, डॉ. सुधीर निखारे, उपसंपादक श्री. दिलीप फलटणकर, सहसंपादक प्रा. पद्माकर पुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात विशेष उपस्थिती सौ. पूनमताई विधाते, स्वप्नालीताई सायकर, जीवन चाकणकर, जयेश मुरकुटे, डॉ. उमरजी, डॉ. रमेश वझरकार, श्री. अमेय जगताप, ऍड. परशुराम तारे, श्री. अजय कदम, दिलीप बोरकर, श्रीकृष्ण काळे, शिवलिंग जमखंडे, पद्माकर राऊत, सुरेश कुंभारे, राजेंद्र महाजन, दीपक पावसे, सुधीर उसवाडकर, किरण कुमार आणि ईतर मान्यवरांची होती. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना ऍड. माशाळकर यांनी जाहिरातदार, लेखक, कवी, मुद्रक यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री. दिलीप फलटणकर यांनी केले.
























