पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनात एक उत्साहवर्धक आणि ऐतिहासिक कार्यक्रम पार पडला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी श्री. के. सी. वेणुगोपाल तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी श्री. रमेश चैनिथला आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशाने पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्रीरंग चव्हाण पाटील यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली.
नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून श्रीरंग नाना चव्हाण पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून, जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या निवडीचे मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. देवीदास भन्साळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ऍड. अभय छाचेड, पिंपरी-चिंचवड येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते श्री. बाबू नायर, प्रदेश काँग्रेस नियुक्त निरीक्षक तसेच जिल्ह्यातील सर्व प्रदेश पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, इंटक आणि विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी आणि तरुणांच्या सहकार्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याच्या निर्धाराने श्रीरंग चव्हाण पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. गोविंदराव मिरघे यांनी केले तर आभारप्रदर्शन ऍड श्री. आकाश मोरे यांनी मानले.कार्यक्रमास शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थित होते.
























