स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूल डी पी रोड माळवाडी हडपसर या शाळेत विद्यार्थी दिनानिमित्त “ज्ञानाचे पहिले पाऊल” नाटक सादरीकरण

हडपसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेतील प्रवेशदिनानिमित्त आमच्या शाळेत ‘विद्यार्थी दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्त इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी “ज्ञानाचे पहिले पाऊल” हे सुंदर आणि प्रेरणादायी नाटक सादर केले.

या नाटकाद्वारे विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणावरील प्रेम, जिद्द आणि ज्ञानप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न प्रभावीपणे मांडले. नाटकामध्ये छोट्या भीमरावाच्या भूमिकेत यश मोरे , सुभेदार रामजी आंबेडकर यांचा भूमिकेत महादेव गायकवाड हे पालक, मुख्याध्यापकाच्या भूमिकेत अमर बडदे मामा , शिक्षकाच्या भूमिकेत अक्षयकुमार कांबळे सर, विद्यार्थ्यांच्या भूमिकेत मोहम्मदसाद,सोहम, सलमान, श्रवण, भानुदास, आर्यन, आयुष यांनी काम केले.नाटकातील पात्रांनी आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.नाटकाचे चित्रीकरण इशिता कांबळे या विद्यार्थिनीने केले नाटकाचे लेखन, दिग्दर्शन ,मार्गदर्शन आणि सादरीकरण अक्षयकुमार कांबळे सरांनी केले.

शाळेचे मुख्याध्यापक विनायक पुणेकर सरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. सुनिल सर, सलमा मॅडम आणि अनुराधा मॅडम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका , बालवाडी शिक्षिका, सेविका , सेवक, रखवालदार आणि पालक उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयाचे व परिश्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनीच केले व उपस्थितांनी “शिक्षण हेच खरी शक्ती” हा संदेश घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

See also  नैतिकतेच्या आधारावर शिंदे फडणवीस सरकारने त्वरित राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी