सुतारवाडी पाषाण पक्षी अभयारण्या लगत राष्ट्रीय महामार्गाजवळ चालू असलेले आर एम सी प्लांट चे काम बंद करण्याची मनसेची मागणी

पाषाण :’भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुतारवाडी पाषाण राष्ट्रीय महामार्ग लगत आर एम सी प्लांट उभा करण्यात येत आहे. पाषाण तलावालगत असलेल्या पक्षी अभयारण्याला या काँक्रीट प्लांट मुळे त्रास होणार असून या प्लांट उभारणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मयूर सुतार व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.

सदर आर एम सी प्लांट ची कार्यपद्धती पाहता या ठिकाणी आजूबाजू असलेल्या नागरी वस्तीला धुलीकन, सिमेंट कण, याचा मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षी व वन्य प्राणी आहेत तसेच या प्लांटमुळे जैवविविधतेला देखील हानी पोहोचणार आहे. हजारो नागरिक पाषाण तलाव परिसरामध्ये फिरण्यासाठी व पक्षी निरीक्षणासाठी घेत असतात पाषाण तलावा लगतच काँक्रीट प्लांट उभारण्यात येत असल्याने याचा त्रास नागरिकांना देखील सहन करावा लागणार आहे.

तसेच या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागणार असून नागरी वस्तीमध्ये व अभयारण्यालगत पुणे महानगरपालिकेने प्लांट उभारण्यास परवानगी देऊ नये तसेच पर्यावरणाची देखील परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे.

आर एम सी प्लांट हा नागरी वस्ती पासून दूर असावा. तसेच या ठिकाणी शेजारीच पक्षांसाठी आरक्षित असे अभयारण्य आहे या ठिकाणी दूर दूर वरून वेगवेगळे पक्षी येतात त्यांच्या सुद्धा जीवनमानावर याचा परिणाम होऊ शकतो. तरी आपण या ठिकाणी जो आर एम सी प्लांट मुळे या परिसरातील जैवविविधता धोक्यात येणार असून पाषाण तलावातील प्रदूषण देखील वाढणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मयूर भगवान सुतार तसेच सुतारवाडी ग्रामस्थ व पर्यावरणासाठी काम करणाऱ्या विविध पर्यावरण प्रेमी संस्था व नागरिकांनी  या परिसरात आर एम सी प्लांट उभारण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.

सुतारवाडी महामार्ग लगत राष्ट्रीय महामार्गाच्या जागेत आर एम सी प्लांट हा उभारण्यात येत असून आधुनिक पद्धतीने नेट व पत्र्याचे शेड उभारून धुळीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने प्लांट चे काम करण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली.

See also  'पिंची’च्या मंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नीलम गोऱ्हे,रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत पारंपरिक खेळांना नवी उभारी