पाषाण : प्रभाग क्रमांक ९ सुस बाणेर बालेवाडी प्रभागामध्ये ताकतवर भाजपा पुढे महाविकास आघाडी आवाहन निर्माण करणार की पक्ष फुटल्यानंतर काहीशी कमकुवत झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजीत पवार) आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वात पुन्हा उचल घेणार याबाबत पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे.
एकेकाळी औंध क्षत्रिय कार्यालयावर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मागील निवडणुकांमध्ये चालू नगरसेवकांची तिकिटे कापल्यानंतर २०१७ मधील मागील निवडणुकीमध्ये अवघ्या 128 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची एक जागा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निवडून आली होती. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वात काम करत असून त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य असतानाच्या सुस, महाळुंगे या दोन गावांचा समावेश प्रभाग नऊ मध्ये झाला आहे. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रभागामध्ये वादग्रस्त जुने चेहरे वगळून काही नवीन चेहरे देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने या प्रभागामध्ये आपला वर्चस्व कायम ठेवत मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. यामुळे हा परिसर सध्या तरी भारतीय जनता पार्टीच्या अ वर्ग यादीतील मानला जात असून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटासाठी मोठी रस्सीखेच सध्या प्रभागामध्ये पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील आदी महत्त्वाच्या नेत्यांची जवळीक असलेले व तिकिटावर दावा सांगणारे अनेक इच्छुक पदाधिकारी या प्रभागात असल्याने भाजपाच्या तिकिटाची हाय व्होल्टेज रस्सीखेच निवडणुकीच्या रिंगणा अगोदर पाहायला मिळणार आहे. तसेच तिकीट वाटपानंतर बंडखोरी टाळण्याचे देखील मोठे आवाहन भाजपा पुढे असणार आहे.
तर विधानसभेला 16 हजार मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाले होते. या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या एकत्रित दोन बैठका झाल्या असून शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस पक्षाने देखील एकत्रितपणे कंबर कसली आहे. त्यांच्यासोबत मनसे आल्यास महाविकास आघाडीची देखील ताकद वाढणार असून प्रभाग क्रमांक नऊ मधील लढत तिरंगी होण्याचे संकेत सध्या दिसत आहेत.
*प्रभाग क्रमांक 9 सुस बाणेर बालेवाडी इच्छुक उमेदवार*
भाजपा – अमोल बालवडकर, प्रकाश बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, विशाल गांधिले, राहुल कोकाटे, लहू बालवडकर, प्रियांका शिवम बालवडकर, रोहन कोकाटे, सचिन दळवी, उमा गाडगीळ, सचिन पाषाणकर, सुभाष भोळ, स्नेहल महाडिक, धनश्री भोते, नारायण चांदेरे, प्रियांका चिव्हे, संतोष तापकीर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – प्रमोद निम्हण, बाबुराव चांदेरे, समीर चांदेरे, राहुल बालवडकर, सुषमा निम्हण, रोहिणी चिमटे, पुनम विधाते, साधना सुतार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे- डॉ. दिलीप मुरकुटे, मयुर भांडे, ज्योती चांदेरे, संतोष तोंडे, महेश सुतार, संजय निम्हण, अशोक दळवी
काँग्रेस – तानाजी निम्हण, जीवन चाकणकर, मंगेश निम्हण, दत्ता जाधव, रोहित धेंडे, राजश्री जाधव, पवन खरात, ओम बांगर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार – जयेश मुरकुटे, संदीप बालवडकर, राजेश बालवडकर, योगेश सुतार
मनसे – सुहास निम्हण, अनिकेत मुरकुटे, मयुर सुतार, सारिका मुरकुटे, शिवम दळवी
रिपब्लिकन पार्टी – संतोष गायकवाड























