औंध : रयत शिक्षण संस्था प्राथमिक विद्यालय औंधगाव येथे आनंद बाजार ही विद्यार्थी पालक यांच्या सहभागातून विद्यार्थ्याना खरेदी विक्री चा कार्यानुभव देणारी संकल्पना मुख्याध्यापिका सौ. सुनीता गायकवाड, जालिंदर ढोरे,यांनी राबवली कार्यक्रमाचे उदघाटन कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पुजन आणि दीप प्रज्वलन करून वसंत जुनवणे, गणेश कलापुरे या मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या उपक्रमात पन्नास विद्यार्थ्यानी सहभाग घेतला या कार्यक्रमात विद्यार्थ्यानी विविध वस्तूची विक्री केली पोहे, उडीदवडा, सामोसे, भेळ, चहा, केळी, कांदे, बटाटे सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी पेन पेन्सिल वह्या अशा अनेक वस्तू या छोट्या विक्रेत्याच्या दुकानात विक्री साठी उपलब्ध होत्या. या उपक्रमांस शुभेच्छा देताना गणेश कलापुरे म्हणाले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी “कमवा आणि शिका” ही संकल्पना राबवली या निमित्त विद्यार्थ्यांना स्वदेशी उत्पादन आणि त्याचे आर्थिक महत्व याचे संस्कार होतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत मेक इन इंडिया हा जो प्रयत्न केला आहे. त्याला यानिमित्त बळ मिळेल आणि पुढील पिढी सक्षम निर्माण होईल या साठी असे उपक्रम आवश्यक आहेत. यावेळी योगेश जुनवणे दत्तात्रय होळकर शिक्षिका सौ शारदा दवंडे, शबाना सय्यद आणि अनेक पालक उपस्थित होते.
























