औंध परिसरातील बिबट्याचा शोध अद्याप सुरूच : अफवांवर विश्वास ठेवू नका वनविभागाचे आवाहन

औंध : औंध परिसरामध्ये असलेला बिबट्या अद्याप पर्यंत पुन्हा कोणाच्याही दृष्टीस पडला नाही सुमारे 36 तास उलटून देखील अद्याप बिबट्या दिसला नाही.

औंध परिसरामध्ये बिबट्या सापडला असल्याचा अफवांच्या बातम्या मीडियासह नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असून बिबट्याच्या शोध कार्यावरती वनविभागाला देखील काम करताना अडथळे निर्माण होत आहे.

नागरिकांनी खात्री पटल्याशिवाय ए.आय. जनरेटेड फोटो पसरवू नये. तसेच वन विभागाच्या यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन भाम्बुर्डा वन विभागाचे फॉरेस्ट ऑफिसर मनोज बारबोले यांनी सांगितले.

See also  म्हाळुंगे टीपी स्कीम लवकरात लवकर मान्यता घेऊन विकास कामांना गती मिळणे बाबत अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेत निवेदन दिले