बाणेर : वामा वुमेन्स क्लबच्या वतीने भव्यदिव्य उत्साहात आयोजित MRS WAMA QUEEN २०२५ या इंटर सोसायटी स्पर्धेचा ग्रँड फिनाले सोहळा यशस्वीपणे पार पडला. विविध सोसायट्यांमधील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, कला आणि सादरीकरणाच्या जोरावर रंगतदार स्पर्धा साकारली. अमृता खतावकर, व वनिता बिडवई यांनी “वामा क्वीन” चा किताब पटकावला.
या मंचावरून महिला सक्षमीकरणाचा आणि समाजातील त्यांच्या भूमिकेचा प्रभावी संदेश देण्यात आला. विजेत्या महिला तसेच सर्व सहभागी स्पर्धकांनी दाखवलेली मेहनत, प्रतिभा आणि उमेद याचे विविध स्तरांमध्ये कौतुक केले जात आहे.
केटेगरी सिल्वर- वय २५-४९
Mrs. WAMA Queen – अमृता खतावकर
Mrs. Graceful Diva – टोपस्वेता भट्टाचार्जी
Mrs. Confident – गौरी जगदाळे
Mrs. Stylish Walk – श्वेता जैन
Mrs. Popular Choice – इंदु राठोड
Gold category – वय ५० पुढ़े
Mrs. WAMA Queen – सौ. वनिता बिडवई
Mrs. Graceful Diva – सौ. नीता जवळेकर
Mrs. Confident – डॉ. मंगला सावरकर
Mrs. Stylish Walk – मोनिता पवार
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ संगीता गोरड, सौ. मनू भोगांवकर, सौ केतकी सोगावकर यांनी काम पाहिले तर सूत्र संचालन- डॉ तेजस्विनी भाले यांनी केले.
यावेळी पूनम विधाते, शोभा श्रीकान्त, रूपाली बार्शीकार, मानसी हीरेकोडी, श्वेताश्री, गीताश्री, सुजाता अग्रवाल आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा पुनम विशाल विधाते यांच्या वतीने करण्यात आले होते.

























