औंध : औंध रोड, बोपोडी, खडकी स्टेशन परिसरात वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत. या परिसरातील वाहतुकीचे नियोजन व्यवस्थितपणे केलं जात नाही त्यामुळे भविष्यात हा रस्ता मृत्यूचा सापळा होऊ शकतो. त्यामुळे आपल्या वतीने आपण वाहतूक सुरळीत करावी व लोकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे सुनील माने यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांना निवेदनदिले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी अधिकाऱ्यांना याबाबत ठोस उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या. याच आशयाचे पत्र सोमवारी महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनाही दिले. या पत्राद्वारे त्यांना ही कामे तातडीने हाती घेण्याची विनंती केली.
संबंधीत अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने सूचना दिल्या आहेत.
१. चंद्रमणी नगर ते खडकी स्टेशनपर्यंत नव्याने रस्ता तयार करणे अतिशय आवश्यक आहे.
२. पाटील कॅाम्प्लेक्सच्या समोर रस्ता ओलांडण्याची सोय आणि बॅरिकेटींग. तसेच दोन्ही बाजूंना स्पीडब्रेकरची व्यवस्था.
३. गणेश मंदिर येथे तातडीने स्पीडब्रेकरची दोन्ही बाजूंना सोय करणे.
४. औंधरोड- सांगवी नवीन पुलाला ॲप्रोच रस्ता तयार करणे
५. खडकी रेल्वेस्टेशन येथील दुरुस्ती, पार्किंग व्यवस्था आणि सिग्नल
६. रेल्वेस्टेशनचे नवीन गेट केवळ शंकर मंदिरासमोर खुले करून तेथेच पार्किंग व्यवस्था करणे. आदी मागण्या या निवेदनाद्वारे केल्या.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे संघटक श्री. शेलार यावेळी उपस्थित होते.
























