राष्ट्रवादी काँग्रेस ‘तो’ दिवस वर्षपूर्तीचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध करणार

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : महाराष्ट्रात सरकार विरोधात बंड करून शिंदे गट वीस जूनला सुरत मार्गे गुवाहटीला गेला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विरोधात आक्रमक झाला असून 20 जून रोजी हा दिवस सत्तांतराचा गद्दार दिवस म्हणून निषेध व्यक्त करण्याचे जाहीर केले आहे.

या दिवशी धोक्यातून झालेल्या सत्तांतराचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे. यासाठी गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के, ही घोषणा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत देऊन या खोके सरकारचा निषेध व्यक्त करावा, शिंदे सरकार हे खोक्यांमुळेच ओक्के केले असल्याने या सरकारचे हे क्षणिक सुखाला उतरती कळा लागली आहे हा विश्वास जनतेला पटवून देण्याचा निर्धार करावा, शहराच्या प्रमुख ठिकाणी या खोके सरकारविरोधात प्रतिकात्मक खोक्यांचा देखावा उभा करावा, अशाप्रकारे पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून या दिवसाचा निषेध व्यक्त करावा, असे प्रदेशाध्यक्षांनी सूचित केले आहे.

See also  'आप ' च्या स्वराज यात्रेची पंढरपुरातून जोरदार सुरुवात